दर्शन माहिती
दर्शन व आरती वेळा
- पहाटे ४:३०मंदिर उघडते
- पहाटे ५:००काकड आरती
- सकाळी ९:००सकाळची आरती
- सायं. ७:००सायं आरती
- दर गुरुवारी सायं. ७:००गुरुवार महाआरतीवाद्यांच्या गजरात महाआरती
सुविधा

विनामूल्य चप्पल स्टँड
मंदिर प्रवेशद्वाराजवळ पादत्राणे ठेवण्याची विनामूल्य सोय.
- फोटो लवकरच
हिरकणी कक्ष
लहान बाळांना स्तनपान करण्यासाठी मातांसाठी स्वतंत्र कक्ष.
मंदिर सभागृह
धार्मिक कार्यक्रमांसाठी सभागृह. माहितीसाठी देवस्थान कार्यालयाशी संपर्क साधा.
भक्त निवास
भाविकांसाठी निवास खोल्या उपलब्ध. सध्या ऑनलाइन आरक्षण नाही; कार्यालयात संपर्क साधावा.
वाहनतळ
मंदिराच्या वाहनतळापर्यंत वाहन जाऊ शकते.

देणगी व चौकशी विभाग
देणगी, पावती व सर्व चौकशीसाठी.
कसे पोहोचाल
कळंब हे यवतमाळ-नागपूर मार्गावर आहे. यवतमाळपासून सुमारे २०-२२ किमी आणि नागपूरपासून सुमारे १३० किमी अंतरावर आहे. मंदिराच्या वाहनतळापर्यंत रस्ता आहे.
- बस: नागपूर व यवतमाळ येथून दिवसभर बसेस उपलब्ध आहेत. अमरावती व अकोला येथूनही बसेस धावतात.
- रेल्वे: जवळची रेल्वे स्थानके धामणगाव व वर्धा.
- खाजगी वाहन: मंदिराजवळ वाहनतळ आहे.